मुंबई-पुणे मार्गावर १६ किलो गांजा पकडण्यात खालापूर पोलिसांना यश… सापळा रचून अंदाजे चार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त…

0
22

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जून कदम) :-

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावच्या हद्दीत असणाऱ्या अगरवाल पॅकर्स आणि मुव्हर्स या कंपनीच्या समोर मुंबई मार्गावर १६ किलो गांजा खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली पकडण्यात आला…. याची किंमत अंदाजे चार लाख रुपये आहे…..

मुंबई चेंबूर येथून प्रवीण गुप्ता (यूपी) हा रिक्षा क्रमांक एम एच ०३ डीएस १८३८ ही घेऊन चेंबूर येथून दोघांना घेऊन खोपोली येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार हे पोलीस स्टाफ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग येथील अधिकारी व अंमलदार व पंच यांच्यासह अगरवाल पॅकर्स अँड मूव्हर्स समोर सापळा रचून रिक्षा पकडली असता रिक्षात दोन व्यक्ती बसल्या होत्या, त्यांची झडती घेतली असता अंदाजे १६ किलो गांजा सापडला. आरोपी मनोज प्रधान, वय ३५ व चंदन पुर्णा प्रधान, वय २९, खोलीकुट, जिल्हा गोंजाम ओरिसा व रिक्षा चालक प्रविण गुप्ता, वय ३८ रा. चेंबुर अटक करण्यात आली….

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी रायगड येथे रुजू झाल्या पासून गैर व्यवहार, दोन नंबर धंदेवाले यांचे धाबे दणाणले आहेत…. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मुळे रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे…. त्यांच्या मुळेच गुन्हेगारीला आळा बसेल असे सामान्य माणसाला वाटत आहे….

पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक निरीक्षक संतोष आवटी, उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, मोहन बहाडकर, हवालदार अक्षय जाधव, सुदीप पहेलकर, बाबासाहेब पिंगळे, ओमकार सोंडकर, विशाल शिंदे, कॉन्स्टेबल घुले, गर्जे, तडवी, वरपे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शामराव कराडे, शाखा अलिबाग येथील अधिकारी सपोनी भास्कर जाधव व स्टाफ यांनी ही कारवाई केली….