रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकेच्या निवडणूक होतील.रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी नगरसेवक युवा कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून रोहा नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत सुनील तटकरे यांची प्रचारात डोकेदुखी मात्र कमी होणार असल्याचे दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून दिसून येत आहे..
रोहा नगरपालिकेत अनेक वर्षांच्या निवडणूक झाल्या…या ठिकाणी राष्ट्रवादीची एखादी सत्ता येत असली तरी अनेक निवडणुका सुनील तटकरेंसाठी डोकेदुखीच्या ठरल्या होत्या…परंतु आता राजकारणात कुंडलिकेचा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे…येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणूक होत आहेत…या अगोदरच मागील निवडणुकीत राष्ट्रवादीशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडलेल्या समीर शेडगे यांनी असंख्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सुनील तटकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.समीर शेडगे तसा ताकदीचा जनसंपर्क असणारा नेता हे सुनील तटकरेंना सुद्धा माहित आहे…शेडगेंचा प्रवेश ही हटकेच झाला त्यामुळे रोहा नगरपालिकेत आता राष्ट्रवादीच्या विरोधात लढणाऱ्या विरोधकांची ताकद कमी पडणार आहे. तसेच दर्जेदार झालेले व येत्या काळात होणारे प्रकल्प नदी संवर्धन, शिवस्मारक,शिवसृष्टी नाट्यगृह बहुउद्देशीय इमारत, क्रीडांगण ,हनुमान टेकडी, सुशोभीकरण,हनुमान मंदिर,मुंबई प्रमाणे क्वीन नेकलेस विद्युतीकरण आणि भविष्याच्या काळात रोहेकरांचे आराध्य दैवत धावीर महाराज यांचे होणारे मंदिर , हे सुनील तटकरे ,अनिकेतभाई व आदितीताई यांच्या संकल्पनेतून होणार असल्याने नक्कीच काहीतरी दक्षिणेत व कोकणात असणारे प्राचीन मंदिराचा ढाचा असे नाविन्य धावीर महाराज मंदिर प्रतिकृतीमध्ये असणार आहे.त्यामुळे रोहे शहराचा झपाट्याने होत असलेला विकास युवा नेते अनिकेत तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या तरुणाचां फौज फाटा व पक्षप्रवेश पाहता रोहा नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडणूकित विरोधी उमेदवाराची ताकद कमीच पडणार असल्याचं दिसत आहे तर शिंदे गट शिवसेना हे युतीत सक्रिय आहेत…युती झाली नाही तर बलाढ्य राष्ट्रवादी समोर यांची ताकद अपुरी पडेल ही वस्तुस्थिती नाकारात येत नाही …त्यामुळे रोहा नगरपालिका निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवताना खासदार सुनील तटकरेची डोकेदुखी कमी होणार असे अलबेल चित्र दिसून येत आहे..