महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
आई पद्मावती कला केंद्र,महाड शिरगाव फाटा येथे यंदाही गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.येथे बनवण्यात येणाऱ्या मूर्ती पीओपीपासून साकारल्या जात असून, त्यांना अनोखा आकार व साज चढवला जात आहे.
प्रथम मूर्तीवर सफेद शेड दिला जातो, त्यानंतर बॉडी कलरिंगचे काम केले जाते. प्रत्येक मूर्तीला सिद्धशास्त्रीय पद्धतीने धोतर व फेटा नेसवून सजवले जाते.विविध रंगसंगती आणि पोशाखांनी नटलेले हे गणपती लक्ष वेधून घेतात.येथे गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन घडते. बाळरूपातील गणेश, माऊलीच्या रुपातील गणेश, चिंतामणी, लालबागचा राजा अशा अनेक रूपांमध्ये हे बाप्पा प्रकटले आहेत.त्यांच्या ड्रेसिंगमध्ये पारंपरिकतेबरोबरच नाविन्यही पाहायला मिळते.प्रत्येक मूर्ती एक खास अनुभव देते. पारंपरिकतेचा गंध आणि नवकल्पनांची झलक असलेल्या या मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी वाढत आहे…