एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक… अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला तर एकजण गंभीर जखमी…

0
19

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

मुंबई-गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ शुक्रवारी (ता. 1) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाला.या अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला आहे…या अपघातात ट्रक चालकाकडील बाजूचा भाग आतमध्ये ठोकला गेला, त्यामुळे चालकाचा पाय त्यामध्ये अडकला होता…ताबडतोब स्थानिकांच्या मदतीने ठोकलेल्या एसटीला लोखंडी साखळदंड लावून ट्रकचा आतमध्ये घुसलेला भाग खेचण्यात आला आणि ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले…त्यानंतर चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे…