पोलादपूर मधील दिव्यांगांसाठी संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्थेची स्थापना… समस्या सोडवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हेतू…

0
15

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

महाड पोलादपूर तालुक्यातील दिव्यांगांना संघटीत करून त्यांच्या समस्या सोडवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे…. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष फैज उमर हुर्जुक हे आहेत….
या संस्थेचा रजि. नं. MH 224/2025/Raigad हा असून, उपाध्यक्ष आरती सुगदरे, कृष्णा लाड, सचिव सबा वारोसे, सहसचिव मोहसिन दरेखान, खजिनदार इम्रान सावंतसह खजिनदार सनिल जंगम, सदस्य मंजुषा साबळे, दिलीप पवार, संजय राक्षे, गफूर मापकर यांची निवड करण्यात आली आहे….
या संस्थेचे ध्येय शासकीय योजना व निधीचा लाभ मिळवून देणे, अन्याय विरोधात लढा देणे
दिव्यांग भवनची स्थापना करणे, दिव्यांगाना रोजगार मिळवून देणे असा असल्याचे अध्यक्ष फैज हुर्जुक यांनी सांगितले…. अपंगाचे दैवत माजी राज्य मंत्री बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शना खाली ही संस्था दिव्यांग बांधवासाठी सदैव सक्षमपणे कार्यरत असणार आहे… महाड पोलादपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आमच्या संस्थेच्या प्रवाहात सामिल होवून आम्हाला तुमच्या समस्याचे निवारण करण्याची संधी द्या असे आवाहन फैज हुर्जुक यांनी केले आहे…