रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मात्र राष्ट्रवादीला बळ… काँग्रेसचे प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केली खदखद…

0
40

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी अखेर पक्षातील नाराजी स्पष्ट करत काँग्रेसला रामराम ठोकला असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे…

अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी सांगितले की,माझ्या वडिलांनी तब्बल 38 वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली…पण तरीही पक्षाकडून त्यांच्यावर अन्यायच झाला..त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही आणि आम्हीही तसंच वागलो.मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्ष हे जनतेचे प्रश्न सोडविणारे माध्यम असायला हवे,परंतु रायगड जिल्ह्यात काँग्रेसला यश आले नाही.काँग्रेसमध्ये राहून काहीच साध्य होत नाही.जनतेचे प्रश्न सुटत नाहीत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,असे सांगत त्यांनी आपली खदखद मोकळेपणाने व्यक्त केली…प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत…उद्या ते अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत,त्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसला हा एक धक्का म्हणावा लागेल…तर राष्ट्रवादीला एकप्रकारे बळ मिळणार असल्याचे बोलले जातेय…