लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा… नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे प्रतिपादन…

0
8

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या थोर विभूतींनी स्वराज्य, सामाजिक समता आणि जनजागृतीचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा,” असे प्रतिपादन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.ते लोकमान्य वाचनालय, नांदगावतर्फे आयोजित वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रमणलाल छाजेड होते. स्टेट बँकेचे व्यवस्थापक वीरेंद्र विक्रम व संस्थेचे चिटणीस प्रभाकर काकळीज हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तराज छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद बुरुकुल यांनी तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक भिकाजी पाठक व शंकर सोनवणे यांनी केले.

या वकृत्व स्पर्धेत नांदगाव शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू आदी भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर भाषणे दिली. एकूण ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेला लाभला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.