राज ठाकरेंचा इशारा आणि मनसेचा प्रत्यक्ष हल्ला…पनवेलचा डान्स बार उद्ध्वस्त… हे रायगड आहे की बारगड?राज ठाकरेंच्या संतापानंतर मनसेचा धुमाकूळ…

0
68

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांवर तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर काही तासांतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ लेडीज डान्स बारवर धडक कारवाई केली.मध्यरात्रीच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी बारमध्ये घुसून जोरदार तोडफोड केली. फर्निचर, साउंड सिस्टीम आणि लाईटिंग उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.राज ठाकरे यांनी शनिवारी (2 ऑगस्ट) पनवेलमध्ये आयोजित सभेत रायगड परिसरात mushroom होत चाललेल्या डान्स बारांविषयी नाराजी व्यक्त केली होती.

जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती, तिथे डान्स बार चालवले जात आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.या भाषणाच्या काही तासांतच, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेल तालुक्यातील कोन गावातील ‘नाईट रायडर्स’ बारवर हल्ला चढवला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १५ मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.