चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) : –
राज्य सरकारने १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाची सुरुवात केली असून, आजच्या नियोजित तिसऱ्या दिवशी रस्ते मोकळे करून दुतर्फा झाडे लावण्याच्या कार्यक्रमाबरोबर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले… त्याचेच औचित्य साधून नाढाल दांडवाडी येथील रस्ता मोकळा करून शेतकरी यांच्यासाठी वाट तयार करून देण्यात आली….
खालापूर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी सजा लोधीवली कार्यक्षेत्रातील मौजे नढाळ दांडवाडी येथील पाणंद रस्ता गेली काही वर्ष बंद होता…. त्यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, गावातील पाळीव जनावरे यांना वावरता येत नव्हते… महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी असलेला जुना पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला… या रस्त्याची साफसफाई, डागडुजी करण्यात आल्यावर दुतर्फा आंबा, चिकू व चिंचेची झाडे लावण्यात आली… मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर व तलाठी मधुसूदन पांपटवार यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या महसूल कार्यक्रमाचे आयोजन केले होते… लोधीवली ग्रामपंचायतचे सरपंच सौ. पूजा तवले, सामाजिक कार्यकर्ते नितीन तवले, खालापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष सचिन चाळके, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते…. दंडवाडी पाणंद रस्ता मोकळा केल्यावर दुतर्फा झाडे लावताना ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पांपटवार, नितीन तवले व मान्यवर उपस्थित होते…