नडोदे येथे महसूल सप्ताह निमित्ताने विविध योजनांना सुरुवात…रखडलेली कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना…

0
5

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

महसूल सप्ताह निमित्ताने मौजे नदोडे विचारवाडी येथे महसूल सप्ताह साजरा करून शासकीय योजनांना सुरुवात करण्यात आली, त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थ यांच्यात समाधानाची भावना निर्माण झाली आहे….

ग्रुप ग्रामपंचायत नडोदे हद्दीतील रस्ते विविध कारणांमुळे रखडले होते, त्यामुळे ग्रामस्थांना आपली शेती, भाजीपाला यांचे मळे तसेच पाळीव जनावरे यांना फिरण्यास आणि चरण्यास नेहमीच अडथळा होत असे… मात्र शासनाने महसूल सप्ताह निमित्ताने पाणंद रस्ते व शिवरस्ते यांची मोजणी करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी आखून दिल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या उपस्थितीत तहसीलदार अभय चव्हाण यांनी सुरू केल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांनी कृतज्ञता व्यक्त केली….

महसूल सप्ताह निमित्ताने रखडलेली कामे मार्गी लागल्याने महसूल सप्ताहाचे फळीत झाले… या महसूल सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी होऊन गावच्या प्रगतीत हातभार लाऊन शासनाचा उद्देश सामान्य जनतेला समजून सांगा, असे आवाहन खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले आहे… कार्यक्रमास महसूल मंडळ अधिकारी चौक माणिक सानप, तलाठी माधव कावरखे, तलाठी अक्षय गावडे यांनी विशेष मेहनत घेतली…. सरपंच निकिता भालेराव, उपसरपंच सुवर्णा अनिल घोसाळकर, पोलिस पाटील सुरेश ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी सुनील घोसाळकर, संतोष पालकर, नरेंद्र साळवी, तेजस पाटील, रघुनाथ पाटील, विलास शिंदे, रमेश शिंदे, विनोद शिंदे, अॕड.अनिकेत विचारे, प्रणय घोसाळकर, ऋषिकेश घोसाळकर, नितीन साळवी, चंद्रकांत विचारे, श्रीकांत भालेराव, ओमकार जंगम,दे वेंद्र शिंदे, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….