भागाड-भादावमध्ये शिक्षणाचा ‘स्टील’ बळकटीकरण!…

0
8

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत माणगाव नगरपंचायत हद्दीतील रा.जि.प. शाळा भादाव व विळे-भागाड MIDC परिसरातील केंद्र शाळांचे संपूर्ण नूतनीकरण करत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि आकर्षक शिक्षणमंच साकारला आहे. ३० जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या उद्घाटन समारंभात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वू सुक चोई, प्रशासन प्रमुख महेंद्र तट्टे, स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इमारतींचे रंगरंगोटी, स्लायडिंग खिडक्या, शौचालयमार्ग दुरुस्ती यासारख्या सुधारणा करून दोन्ही शाळांना सुटसुटीत आणि प्रेरणादायी रूप देण्यात आले. विद्यार्थ्यांनी पोस्कोचे मनःपूर्वक आभार मानत शिक्षणात नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. मुख्याध्यापकांनीही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, “पोस्को फक्त सुविधा देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घालतो,” असे मत व्यक्त केले. आतापर्यंत १३ शाळांचे नूतनीकरण पूर्ण करून पोस्कोने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी आपली भक्कम बांधिलकी अधोरेखित केली आहे. हा उपक्रम केवळ CSR नव्हे, तर सुशिक्षित समाजनिर्मितीकडे उचललेले प्रेरणादायी पाऊल आहे.