काँग्रेसला उभारी देण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात रणशिंग फुंकले… प्रवीण ठाकूर यांच्या प्रवेशानंतर राजाभाऊंची सुनील तटकरेंवर टीकेची झोड…

0
6

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

काँग्रेसला अलिबागमधून खासदार सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातरजे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकलेत… राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला, त्यानंतर काँग्रेस संघटना मजबुतीसाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे… काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठलेत, आता पक्ष वाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागलीय… त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे बोलले जात आहे.