अखेर पनवेल तालुका पोलिसांनी मनसे नेते योगेश चिले यांना घेतले ताब्यात… 

0
5

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

राज ठाकरे यांनी डान्सबारविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स ऑर्केस्ट्रा अँड बारवर जोरदार तोडफोड केली. या घटनेनंतर मनसेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांची भीती वाटून घटनास्थळावरून पळून गेले..खरे तर, ही तोडफोड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर येऊन “ही कारवाई राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ केली”असे स्पष्टपणे सांगितले असते, तर त्याला राजकीय धार आली असती. मात्र, घाबरून पळ काढल्यामुळे मनसेची भूमिका अस्पष्ट राहिली…

अखेर, पनवेल तालुका पोलिसांनी मनसे नेते योगेश चिले यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.अद्याप काही कार्यकर्ते फरार असल्याची माहिती आहे…या प्रकरणावरून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो – मनसेला फक्त एकच बारच सापडला का? आसपास आणखी २-४ बार अस्तित्वात असताना विशेषतः नाईट रायडरलाच लक्ष्य का करण्यात आले,याबद्दल चर्चा सुरू झाली आहे…

दरम्यान, निवडणुकीचा माहोल सुरू असल्यामुळे ही कारवाई निवडणूकपूर्व स्टंट तर नाही ना? असा संशय डान्सबार मालकांकडून व्यक्त केला जात आहे…या पार्श्वभूमीवर, मनसे नेत्यांनी घाबरण्याची गरज नव्हती.त्यांनी जर ठामपणे स्वीकारले असते की “होय, ही कारवाई आम्हीच केली”, तर त्याचे श्रेय त्यांनाच मिळाले असते अशी चर्चा पनवेलकर करत आहेत…