महास्वामित्व योजने अंतर्गत सनद आणि नकाशा वाटप… भूमी अभिलेख खालापूर यांचा स्तुत्य उपक्रम…

0
9

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

उप अधीक्षक भूमि अभिलेख खालापुर कार्यालय यांच्या मार्फत महास्वामित्व योजने अंतर्गत गावठाण व घरे यांची मोजणी ड्रोन द्वारे करण्यात आली होती… सदर भूखंड मालक यांना सनद व नकाशे वाटप करण्यात आले…

महास्वामित्व योजने अंतर्गत खालापूर तालुक्यात ड्रोन भूमापन झालेल्या गावातील सनदा वाटप करणे, महास्वामित्व योजनेचे महत्व व कार्यपद्धती याचे प्रशिक्षण देणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या… त्यानुसार मौजे नडोदे, पराडे, खरसुंडी, गणेशनगर, गोहे, तळवली, नढाळ या महसुली ७ गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन वाटपाचा कार्यक्रम पार पडला…. संबंधित गावचे ग्रामसेवक यांनीही सनद वाटप कार्यक्रमात मदत केली…. नियोजन करण्याबाबत गावांमध्ये तशी दवंडी देण्यात आली…. सदर योजनेसाठी भाऊसाहेब मुंडे, बाळकृष्ण सोनावणे, ययातीराज खांडेकर, दतात्रेय हराळ, कैलास शेडगे, श्रीमती दीपमाला रजपूत, पांडुरंग कोळेकर, अनिकेत ठाकूर, श्रीमती उज्वला वाघमारे अण्णासाहेब सोमवंशी, उजन कोळेक, संदीप थोरवे या कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले….

उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग, शिरस्तेदार समाधान पाटील, कार्यालय अधिक्षक उत्तम केंद्रे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करून शंकांचे यांचे निरसन केले… विशेष बाब म्हणजे गणेशनगर व पराडे या दोन्ही गावातील सनद वाटप होऊन १०० टक्के वसुली देखील झाल्याने एक समाधानाची बाब समोर आली असून, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होत असून नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, असे उप अधिक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले….