रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुर्यवंशी या कायद्याची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांला पोलिसांनी केलेली मारहाण व त्यात त्याचा हकनाक बळी गेला. हे प्रकरण ताजे असतानाच रायगड जिल्ह्यातही एक असाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याचे पँथर सुशीलभाई जाधव यांनी आक्रमकपणे सांगितले. पेण पोलिसांनी कृष्णा सोनावणे यांना जातीवाचक शिवीगाळ करून बंद खोलीत बेदम मारहाण केली असल्याचे पीडितांनी तक्रारीत म्हटलंय. सोनावणे कुटुंबियांना जलद न्याय मिळावा यासाठी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशिलभाई जाधव , कृष्णा सोनावणे व अन्य सहकारी यांचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आमरण उपोषण सुरू आहे. याप्रकरणी संबंधित दोषी पोलिसांवर एट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा व तात्काळ निलंबन करण्याची मागणी सोनावणे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली, मात्र न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने पँथर सुशीलभाई जाधव यांच्या नर्तृत्वात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला भिम आर्मी जिल्हाध्यक्ष सिदधोधन कांबळे,रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम यांनी या पाठिंबा दर्शविलाय. या आंदोलनाला रायगड सह महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा मिळत असल्याने सोनावणे कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
यासंदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.