अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
साळाव ते रोहा मार्गावर तळेखार ते साळाव मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचे काम रखडल्याने या मार्गावरून प्रवास करणारया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसात अक्षरशः चिखल साचला आहे, खडडे पडले आहेत. यातून वाहन चालवणे म्हणजे मोठी कसरत बनून राहिली आहे. यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी संताप व्यक्त केलाय. दोन दिवसांपूर्वीच मोहिते यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी केली. रस्त्यावरील खडडे तातडीने बुजवावेत अशी मागणी केली. यासंदर्भात मोहिते यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेवून या विषयाचे गांभीर्य त्यांच्या कानावर घातले. आमदार दळवी यांनीही याबाबत अधिकारी आणि ठेकेदार यांना तशा सूचना दिल्या. जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहने या रस्त्यावरून ये – जा करीत असतात. यामुळे रस्ते दुरूस्तीच्या कामात अडथळा येत आहे. ही वाहतूक थांबवून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम दिलासादायक करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितलं.