निसार फिरफिरे यांची अंजुमन इस्लाम जंजिरा कार्यकारिणीत उल्लेखनीय निवड; शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल…

0
18

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ उभारणारे, परिवर्तनशील नेतृत्व, सामाजिक जाणीव व प्रभावी वक्तृत्वाची ओळख असलेले मांजरोणा (ता. माणगाव) येथील निसार फिरफिरे यांची अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीत उल्लेखनीय निवड झाली आहे. ‘रॉयल एज्युकेशन अँड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’चे ते दोन दशके जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असून, शिक्षक विकास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेची उन्नती यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कार्यकारिणी निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या अनुभवामुळे अंजुमनच्या कार्याला नवी दिशा लाभेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२७ जून रोजी अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया रायगड जिल्ह्यात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी नाजीम चोगले, सचिवपदी निसार बिरवाडकर, सहसचिवपदी अ. समद मुहीबुल्ला नजीर (मेंदडी), खजिनदारपदी अव्वाब हबीब फकिह यांची निवड झाली. मुरुड विभागाचे अध्यक्ष लियाकत कास्कर (राजापुरी), सचिवपदी इम्तियाज मलबारी, (मजगांव) व कार्यकारिणी सदस्यपदी रिदवान फहीम यांची निवड तर म्हसळा विभागासाठी अध्यक्ष फझल हलडे, सचिवपदी मजहर काझी तर कार्यकारी मंडळामध्ये निसार फिरफिरे यांची सदस्य तर मुंबई विभागासाठी डॉ. खलील मुन्शी, सचिव अबीद हनवारी तर कार्यकारी मंडळ सदस्त म्हणून नय्यार शाबान आणि गोंडघर विभागासाठी अध्यक्ष म्हणून मुनाफ पस्वारे, सचिवपदी वर नियुक्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रात सेवा देणारे तथा, पत्रकारीता क्षेत्रा मध्येही भरीव योगदान देणारे सर्फराज दर्जी आणि सदस्य म्हणून जाहीद रिजवी यांचीही निवड झाली. निसार फिरफिरे यांची ही निवड त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घकालीन समर्पणाची दखल म्हणून संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.