अलिबाग मच्छिमार सोसायटीचे संचालक मंडळ पारदर्शी असावे आवश्यक… मच्छीमारांच्या सोसायटी विरोधात एल्गार…  

0
17

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी व पहिली मच्छीमार संस्था ही अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी लि. ही आहे. या संस्थेचां कार्यभार समाजकल्यांणासाठी व्हावा यासाठी यावर असणारे संचालक मंडळ हे पारदर्शी असावे यासाठी निवडणूक होणे गरजेचे असल्याने निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग कोळीवाडा परिवर्तन आघाडी चे ज्येष्ठ उमेदवार शंकर नाथा पेरेकर यांनी अलिबाग कोळीवाडा येथील जलसापाडा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये व्यक्त केले…

यावेळी शंकर पेरेकर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी लि.ची स्थापना ही ०२ फेब्रुवारी १९४९ रोजी स्थापन झाल्या पासून आज पर्यंत एकही निवडणूक न होता संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून द्यायचे… मात्र बिनविरोध निवडून दिलेले संचालक मंडळ यांनी त्यांच्या मर्जीने काम करीत अलिबाग कोळीवाड्यात असणाऱ्या मच्छीमार बांधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे… अनेकांनी सभासद होण्यासाठी अर्ज केले मात्र त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांचा विचार करत त्यांना सभासद केले… मात्र सभेत जे विरोध करतील अशा नागरिकांना त्यांनी जाणीवपूर्वक सभासद केले नाहीत… अलिबाग मच्छीमार सोसायटीची निवडणूक ही उघडपणे घेतल्यास संस्थेत मक्तेदारी असणारे संचालक मंडळ हे विविध प्रकारे सभासद नियुक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही… हे टाळण्यासाठी संचालक मंडळ निवडणूक प्रक्रीया पारदर्शी होणे गरजेचे होते. तसेच संस्थेचे काही संचालक यांना विविध प्रकारच्या समस्या मच्छिमार बांधवांना सतत सतावत आहेत. यामुळे त्याचा विकास कुठे तरी खुंटला आहे.तर काहीजण संस्थेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्याचे कार्यदेखील करीत असल्याचे निदर्शनास आले आहे…

यासाठी लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचा अवलंब करून सदर निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेण्यात यावी आणि सदर निवडणूक घेत असताना निवडणूक आयोगांच्या संदर्भात असलेले नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे… आमच्या मागणीची दखल घेऊन ती मान्य केली आहे… सदर संस्था ही जिल्ह्यातील पहिली नोंदणीकृत संस्था असून ३१ डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत केवळ ८५४ सभासद असून यातील पन्नास एक सभासद मयत आहेत… या संस्थेची वार्षिक उलाढाल सरासरी वीस कोटी रुपयाच्या आसपास आहे…

संस्थेच्या मागील कार्यकारिणी मंडळ यांचा २ जानेवारी २०२३ रोजी कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने त्यांना काही काळ मुदतवाढ देण्यात आली होती… यावेळी रत्नाजली पेरेकर यांनी सांगितले की, आमच्या सोसायटीला ७७ वर्षे झाली आहेत. या सोसायटीमुळे आमच्या मुलांवर बेकारीची परिस्थिती ओढवली आहे… ही सोसायटी आमच्या गरीबांची झाली पाहिजे… श्रीमंतांनी यावर खूप मजा मारली आहे… आमची मुले ही सोसायटी कडून मिळणाऱ्या दाखल्यापासून वंचित आहेत…  दाखला न मिळाल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज अथवा लाभ मिळत नाही. या सोसायटीची भरभराट झालीच पाहिजे… असे रत्नाजली पेरेकर यांनी सांगितले… यावेळी विश्वास पांडूरंग भगत, सुनिल शंकर बोभाटे, गणेश विश्वनाथ मुकादम, जयेंद्र दत्ताराम पेरेकर, विजेता परशुरांम सारंग आदी उमेदवार यांच्यासहित रुपाली पेरेकर, प्रवीण तांडेल आदी कोळी बांधव उपस्थित होते…