स्कोर से इंडिया यांच्या सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम… शालेय विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पाणी बॉटल, रायटिंग पॅड व हेल्थ किटचे वाटप…

0
6

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी स्कोर से इंडिया यांच्या सामाजिक विभागामार्फत, देसाई फाउंडेशन गुजरात यांच्या माध्यमातून सुदर्शन कंपनी महाड,वनराई संस्था पुणे व ग्रामपंचायत वरंध यांच्या सहकार्याने श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंध येथील इयत्ता ५ वी ते 10 वि च्या विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पाणी बॉटल, रायटिंग पॅड व हेल्थ किट यांचे वाटप करण्यात आले. तसेच वरंध ग्रामपंचायत येथे महिलांकारिता मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित महिलांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्कोर से इंडियाचे सी. ई. ओ. पराग गुप्ता सर, सी. एफ. ओ. मयंक टंडन सर, व त्यांची सर्व टीम, देसाई फाउंडेशन गुजरातचे प्रतीक पारेख सर व टीम तसेच सुदर्शन कंपनीचे संजय कचरे साहेब, दिशांत ढाणे, वनराई संस्थेचे उदय पोळ, धनंजय पाटील ग्रामपंचायत वरंधचे सरपंच जयवंत देशमुख साहेब उपसरपंच सुलभा देशमुख ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाष देशमुख, राजेश धनावडे, देविदास देशमुख, छाया देशमुख, कीर्ती देशमुख ग्रामसेवक धस साहेब ग्रामस्थ महिला व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते तसेच श्री. छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंधचे मुख्यध्यापक श्री नामदेव डिगे सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला…