पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई… गोवा बनावटीचा सहा लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलादपूर तालुक्यातील दिविल या गावांमध्ये मोठी कारवाई केली आहे. सुमारे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे 56 बॉक्स विदेशी दारू सापडली आहे. आरोपी रुपेश मोरे राहणार दिवील याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे, अधीक्षक रविकिरण कोल्हे, विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे , दुय्यम निरीक्षक रश्मीन समेळ, प्रसाद दाते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती पोकळे, निमेश नाईक, जवान रिंकेश धुळे, कल्याणी ठाकूर, रचना मोहिते, प्रसाद गिरी सुनील घन, रणजीत माकोडे यांच्या टीमने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.