रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
मागील 17 वर्षांपासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम धीम्यागतीने सुरू आहे…. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली… मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरणाचे काम पुढील 1 वर्षात 100 टक्के पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली….
गणेशोत्सवात कोकणवासीय व चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या… महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास, सर्व्हिस रोड, अपघाती ठिकाणे, नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या…. ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले…. यावेळी वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या…. पनवेल पळस्पे – कासु ते वडपाले महाड पर्यंत ते महामार्गाची पाहणी करणार आहेत… यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले, वैंकुठशेठ पाटील, नॅशनल हायवेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते…