भारत मातेची १७ वर्षे सेवा बजावणारे भारतीय सैनिक कमलाकर भऊड सेवानिवृत्त… आंबेघर येथे भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत…

0
5

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

भारतीय सैन्यात १७ वर्षे प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले हवालदार कमलाकर बळीराम भऊड हे आपल्या स्वगृही परतल्यानंतर आंबेघर ग्रामस्थांच्या वतीने पेण ते आंबेघर अशी भव्य दिव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले….

सन २००९ मध्ये पांडुरंग जेधे यांनी भारतीय सैन्यात जाण्यासाठी मार्ग दाखविला आणि स्वतःच्या कर्तुत्वाने कमलाकर भऊड हे सैन्यात भरती झाले… भारत मातेच्या रक्षणासाठी मणिपूर, मध्यप्रदेश, चाणीगौंड कारगिल, बंदीपुरा श्रीनगर, बिकानेर राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, गुजरात या ठिकाणी सेवा बजावून १६ मराठा एलआय बटालियन आणि मराठा रेजिमेंट मधून सेवा पूर्ण केली तसेच उरी सेक्टर ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे…. कमलाकर भऊड यांचे निफाड हे जन्मगाव आहे, पण आता ते आंबेघर येथे स्थायिक झाले असून त्यांच्या कामगिरीचे संपूर्ण पेण तालुक्यातून कौतुक केले जात आहे… त्यांची भव्य मिरवणूक पेण शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पेण चावडी नाका त्यानंतर गणपती वाडी जवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक पर्यंत बाईक रॅली झाली…. नंतर तेथून रथामध्ये बसून त्यांना आंबेघर गावात सन्मानपूर्वक आणले गेले… यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान अशा जोरदार घोषणा देत देशभक्तीपर गीतांनी वातावरण गजबजून गेले होते…. या मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला, तरुण, लहान मुले हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते…

त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम झाला…. या कार्यक्रमाला माजी नायब सुभेदार समीर आठवले, भारतीय सैनिक मंदार भोईर, महाराष्ट्र पोलीस उर्मिला भोईर, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी, शिरीष मानकवळे, गजाजन मोरे, माजी सैनिक सचिन पाटील, माजी सैनिक गणेश म्हात्रे, माजी सैनिक योगेश पाटील, माजी सैनिक मंगेश पाटील यावेळी उपस्थित होते…