पनवेल रोडपाली येथील वालदेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू… दर्शन काही काळासाठी बंद… प्रतीक ठाकूर यांच्या हस्ते वालदेश्वर मंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन…

0
5

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

पनवेल शहरातील रोडपाली येथील वालदेश्वर महाराज मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धा स्थान मानले जाते… श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते… मात्र सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे व सौंदयी करणाचे काम सुरु असल्यामुळे भाविकांना देवदर्शनसाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे…

नारायणशेठ शंकर ठाकूर यांच्या परिवारातर्फे पनवेल शहरातील रोडपाली येथे लावण्यात आलेल्या फालकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे… या फलकावर नमूद करण्यात आले आहे की,श्री वालदेश्वर महाराज मंदिराचे बांधकाम सुरु केल्याने काही काळासाठी वालदेश्वर देवाचे दर्शन बंद रहाणार आहे… सदर बांधकामाचे भूमी पूजन व शुभारंभ युवा उद्योजक प्रतीक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले…. वालदेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांना व बंधू भगिनींना प्रो.प्रा. सपना बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तसेच माजी उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ सभापती,नारायण शेठ ठाकूर रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी सर्व शिवभक्तांना पवित्र श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या… यावेळी बांधकामाच्या शुभारंभासाठी श्री.नारायण शेठ ठाकूर यांच्या सहीत गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते…