नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नांदगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी नांदगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व अन्य पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून मानवतेचा व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला….
“हर घर तिरंगा” अभियानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कार्य गौरवले…. यावेळी मुख्याध्यापिका ज्योती काळे म्हणाल्या की, “पोलीस हेच खरे रक्षक असून त्यांच्यामुळेच समाज सुरक्षित आहे. त्यांचा सन्मान व आदर प्रत्येकाने केला पाहिजे.”
पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “ही राखी आमच्यासाठी फक्त एक धागा नाही, तर आमच्या सेवेच्या भावनेला बळ देणारा प्रेरणास्रोत आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या आमच्या ब्रीदवाक्याशी आम्ही सदैव निष्ठावान राहू.”
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, शिक्षक अशोक मार्कंड, सुनिता निकम, गीतांजली मोरे, जया गवळी, कल्पना अहिरे, स्मिता केदारे, तसेच इतर शिक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरद आहेर यांनी केले