महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मा. प्रकल्प संचालिका श्रीम. प्रियदर्शिनी मोरे मॅडम, पंचायत समिती महाड मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती – महाड व सहयाद्री प्रतिष्ठान, जालगाव, ता. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सखींसाठी “नर्सरी व्यवस्थापन प्रशिक्षण” आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना शेतीपूरक उपजिविकेच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना स्वयंपूर्ण उद्योजिका म्हणून सक्षम करणे हा आहे.
या प्रशिक्षणामध्ये कृषी सखींच्या माध्यमातून भाजीपाला, फळबाग रोपवाटिकाच्या नर्सरी कशा प्रकारे सुरू करता येतील, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन कसे घ्यावे, विविध प्रकारच्या कलम पद्धती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी सखींच्या प्रत्यक्ष सहभागातून या प्रशिक्षणात अनुभव आधारित शिक्षणास प्राधान्य देण्यात आले. महिलांनी प्रत्यक्ष विविध कलम बांधणी करुन एक व्यवसाय म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्मसात केला. प्रशिक्षणादरम्यान पंचायत समिती, महाड मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम, पंचायत समिती, पोलादपूर मा. गट विकास अधिकारी श्रीम. दीप्ती गाट मॅडम यांनी सुद्धा प्रत्यक्षिक सहभाग घेतला, तसेच यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, सहयाद्री प्रतिष्ठानचे तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभले.
भविष्यात कृषी सखींमार्फत गावोगावी दर्जेदार नर्सरी उभ्या राहतील आणि नावीन्यपूर्वक उपक्रम उभे राहतील आणि त्या स्वतः केवळ उद्योजिका नव्हे, तर इतर महिलांसाठीही प्रेरणास्रोत ठरतील असा विश्वास सदर प्रशिक्षण दरम्यान मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम यांनी दाखवला, सदर प्रशिक्षण यशस्वीकरणे करिता व प्रशिक्षणकरिता उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार.