पाण्याच्या बाटल्या भरलेला ट्रक कर्जत चौक रस्त्यात आडवा… धोधो पावसात ट्रकवर नियंत्रण सुटले; वाहतूक तात्पुरती कोंडी…

0
3

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

कर्जत आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कर्जत चौक रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या भरलेला ट्रक आडवा झाला. एम एच १५/एच एच/९१९६ क्रमांकाचा ट्रक मुंबईकडे जात असताना ग्रुप ग्रामपंचायत वावरले हद्दीत खैराट जवळ उतरणावर ब्रेक लावला. उतरण आणि वळण असल्याने ट्रकवरील पाण्याचे बॉक्स हलले आणि गाडीवर नियंत्रण सुटले.

धोधो पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली. ट्रक आडवा झाल्याने चौक कर्जत आणि कर्जत चौक या दोन्ही बाजूची वाहतूक तात्पुरती कोंडी झाली. चौक प्रभारी विशाल पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पांडुरंग गबाळे यांच्यासह घटना स्थळी पोहोचून त्वरित कारवाई केली.

हायड्रा बोलवून ट्रक एका बाजूला केले आणि वाहतुकीसाठी एक मार्ग उघडण्यात आला. त्यामुळे काही वेळात वाहतुकीवर नियंत्रण मिळवता आले. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. त्याला तातडीने चौक शासकीय रुग्णालयात दाखल करून मलम पट्टी करण्यात आली. या अपघातात अन्य कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही.

सध्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पांडुरंग गबाळे पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पावसाळ्यात अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.