रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
आगरी समाज सभागृहासाठी भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी ५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या धनादेशाचे सुपूर्दीकरण राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई, भाजप नेत्या गीताताई पालरे, सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आगरी समाजाचे अध्यक्ष ललित ठोंबरे, महिला कमिटी अध्यक्ष रंजनाताई मढवी आणि इतर पदाधिकारी व समाजबांधवही या कार्यक्रमास उपस्थित होते.
आगरी समाजाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी प्रकाशभाऊ देसाई यांनी पुढाकार घेतला असून, समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही या प्रसंगी दिली. देसाई यांनी यापूर्वीही सर्व जाती, धर्म, व समाजसमूहांच्या उत्कर्षासाठी सतत योगदान दिले आहे.
धनादेश सुपूर्दीच्या वेळी आगरी समाजाने देसाईंचे मनःपूर्वक आभार मानले. समाजबांधवांनी देसाईंच्या या पुढाकाराचे कौतुक करत, त्यांच्या प्रेम, सद्भावना आणि समाजप्रती असलेल्या आपलेपणाची दखल घेतली. या प्रसंगी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले

