माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाचा फटका रायगड कराना बसत असून जनजीवन विस्कळीत झाला आहे सलग तीन दिवस मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्ग मानगाव येथे परिसर जलमय होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि अतोनात नुकसान झाले सध्याची ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्ग मानगाव तीनबत्ती नाका येथे तसेच राऊत हॉस्पिटल येथे सुद्धा पाणीच पाणी झालंय त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर देखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग काही वेळ ठप्प ठेवण्यात आला तर काही वाहने पाण्याचा अंदाज घेत बाहेर काढण्यात आली, असाच मुसळधार पाऊस चालू राहिला तर राहिला तर माणगाव मध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे