महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड शहरात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्री दहा वाजता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान ग्रामस्थांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाड शहरातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी देखील पाहणीसोबत सहभागी झाले होते.
पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक ती तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले.