मिठेखार येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू… 

0
10

मुरुड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागाला गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे… आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे… कोकण विभागातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील मिठेखार गावात आज दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत विठाबाई गायकर (वय ७५वर्षे) यांचा मृत्यू झाली असल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण ग्रस्त म्हणून जाहीर केलेले मुरुड तालुक्यातील  प्रसिद्ध असलेल्या विक्रम बिर्ला गणेश मंदिर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्राम पंचायत हद्दीतील मौजे मिठेखार येथे आज सकाळी आठ साडे आठ वाजण्याच्या दरम्यान गावानजीक असलेला मातीचा ढिगारा  घराच्या भिंतीवर आल्याने  भिंत अंगावर पडून ऐंशी वर्षीय महिला विठाबाई गायकर यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील  रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे… सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पासून पावसाने रौद्र रूप धारण केले आहे…  मिठेखार हा गावं जिल्हा प्रशासन यांच्या दप्तरी दरड प्रवण ग्रस्त गाव म्हणून नोंद आहे… गेल्या काही वर्षापूर्वी सुद्धा गावानजीक असलेल्या डोंगराच्या मातीचे भू स्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती खाली असलेल्या घरांवर आली होती… तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्वरित स्वतः घटना स्थळी येऊन पाहणी करीत सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले होते… त्यावेळी तेथे सुरक्षित भिंत बांधण्याचे मंजूर करण्यात आले होते… मात्र पाच वर्षात ती भिंत बांधली गेली नाही… त्यामुळे मिठेखार ग्राम पंचायत ने गेल्यावर्षी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागास भिंत बांधण्या संदर्भात पत्र दिले असल्याची माहिती मिळाली आहे…

आज सकाळी वृद्ध महिला विठाबाई या त्यांच्या दुकानात असताना त्यांना दुकानाच्या मागे एक त्यांना मोठा आवाज आल्याने त्या तिथे पाहण्यासाठी गेल्या असता दुकानलगत असलेल्या डोंगरावरून मातीचा ढिगारा हा दुकानाच्या भिंतीवर आला आणि भिंत ही विठाबाई यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे…

ये घटनेची माहिती मिळताच ग्राम पंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी सदस्य हे ग्रामस्थांसहित घटना स्थळी दाखल होते…  झालेल्या दुर्घटनेची माहिती मुरुड तहसीलदार यांना दिली असता मुरुड तहसीलदार आदेश ढापाल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत सुरक्षितेबाबत उपाय योजना करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या… ग्रामस्थानी सांगितले की या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबाना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी…

यापूर्वीही रायगड जिल्ह्यात अशा  अनेक घटन घडल्या आहेत, त्यामुळे शेकडो निष्पाप नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे… शासन प्रतिनिधी हे या ठिकाणी येऊन केवळ घोषणा करून निघून जातात… मात्र त्यांनी केलेल्या घोषणा आणि आश्वासने यांचे पालन कधीच वेळेवर होत नाही… अशी संतप्त भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थानी व्यक्त केली आहे…