चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
सद्या जोरदार मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.पाऊस थांबायचे नाव घेत नाही, हवामान खात्याने देखील इशारा दिला आहे, त्यात रायगड जिल्हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.खालापूर तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आली.काही गाव दरड प्रणव क्षेत्र यात येतात.मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात काही आपत्ती सारखी दुर्घटना घडू नये, घडल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी त्यासाठी तालुक्यातील खाते प्रमुख यांची बैठक तहसीलदार अभय चव्हाण यांनी आयोजित करून सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल,गटविकास अधिकारी संदीप कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड,वन विभाग अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील सर्व अधिकारी उपस्थित होते.गाव पोलीस पाटील, ग्राम पंचायत अधिकारी, महसूल अधिकारी,मंडळ अधिकारी,यांच्यासह, आपत्ती व्यवस्थापन,क्रेन,हायवा, झाडे कापणारे,रुग्णवाहिका, आरोग्य सेवा,गाव मंडळ, वन विभाग, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, आपत्तीत मदत करणाऱ्या संस्था यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.भ्रमणध्वनी सर्वांनी सुरू ठेवणे महत्वाचे आहे.आपत्ती संदर्भात तात्काळ कार्यवाही करणे, भ्रमण ध्वनी अथवा आदेश येण्याची वाट न पाहणे, योग्य आणि मदत करण्यात यावी, आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून ठेवणे, आणि त्यासह आपत्ती ला तोंड देण्यासाठी तयार रहावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या.