दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव! वावंढळमधील विवेक कदम यांचा थरारक अनुभव… धाडकन खाली पडली चालू वीज वाहिनी; कार थांबली म्हणून टळला मृत्यू…

0
13

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

मित्रांनो, तुम्ही कल्पना करा… कारने जात असताना अचानक समोरच चालू वीज वाहिनी धाडकन कोसळली आणि जीवाचा थरकाप उडाला! होय, अगदी असंच झालं वावंढळमधील विवेक कदम यांच्यासोबत. जेमतेम दोन फुटांवर विजेची तार कोसळली आणि गाडीचा वेग थोडा जरी जास्त असता तर आज एक तरुण जीव गेला असता. दैव बलवत्तर म्हणून विवेक कदम यांचा जीव वाचला.
पण मोठा प्रश्न असा की, हा अपघात फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. वारंवार तक्रारी करूनही जीर्ण तारांची दुरुस्ती केली जात नाही. नुकताच जांभिवलीत एका महिलेचा मृत्यू असाच झालेला असताना अजून किती जीव जायला हवेत?

सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडिक सरळसरळ कंपनीवर आरोप करतायत— “दुर्लक्ष, गैरजबाबदारी आणि निष्काळजीपणा” हेच कारण! ग्रामस्थही संतप्त आहेत, कारण दोन खांबांच्या मधल्या जोडांवर तारं लटकतायत, त्यांना ब्रॅकेट किंवा सेफ्टी अंतर नाही.
नागरिकांचा संताप वाढलाय! मोर्चे झाले, निषेध झाले, आमदार महेश बालदी यांनी बैठका घेतल्या. तरीही परिस्थिती जैसे थे! लोक आता विचारतायत— “काय, आता थेट मंत्र्यांच्या दारात जावं का?” म्हणजे एकीकडे विजेच्या तारांवर जीव टांगणीला लागलाय, आणि दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र गोड झोपेत! आज दैव बलवत्तर म्हणून विवेक कदम वाचले… पण उद्या कोण?? हा खरा प्रश्न आहे!”