रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातलं राजकारण नेहमीच रंगतदार राहिलं आहे, पण आता खरोखरच मोठा भूकंप होणार आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी एक भन्नाट विधान केल…
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी स्वाभिमानी शिवसेना आहे. हे ऐकताच वातावरणात खळबळ उडाली. कारण हा थेट टोला शिंदे गटावर गेला होता. म्हणजेच रायगडमध्ये आता राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा संघर्ष आणखी तीव्र होणार हे नक्की!
पालकांमंत्री पदासाठी राष्ट्रवादी मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गट यांचं भांडण आधीपासूनच सगळ्यांच्या नजरेत आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांचं वाद शिगेला पोहचला आहे, आमदार महेंद्र थोरवे सुनील तटकरे यांना औरंगजेबची उपमा सारखी देत आहेत. आता जर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले, तर रायगडचं राजकारण पूर्ण उलटंपालटं होईल. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ही जोडी जबरदस्त ठरू शकते. स्थानिक पातळीवर आधीच तणाव वाढलेला आहे, कार्यकर्तेही सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत…
येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर तिघांचं समीकरण असेल –
* शिंदे गटाची शिवसेना,
* राष्ट्रवादी काँग्रेस,
* आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना.
पण जर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले, तर शिंदे गटाचं समीकरण कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याच्या राजकारणाला दिशा देत आलं आहे. आता ही नवी युती झाली, तर येणाऱ्या निवडणुकीचा खेळ आणखीच रंगणार आहे. जनतेतही चर्चा सुरू झाली आहे… कोणावर विश्वास ठेवायचा? कोण खरं, कोण फितूर? एकंदरीत, रायगडची ही लढाई म्हणजे निवडणूक नाही, तर एक महाभारत ठरणार आहे!