कोल्हारेत लाखो रुपयांची विकासकामे पूर्ण… स्मशानभूमी शेड,घाट पायऱ्या,रस्ते व स्ट्रीट लाईटचे लोकार्पण…

0
6

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

दि.२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये कोल्हारे वैकुंठ धाम निवारा शेड, गणेश घाट येथील काँक्रीटीकरण व पायऱ्या, पोर्णिमा सोसायटीकडे जाणारा रस्ता, तसेच स्टुडिओ हाय-फाय फेस टू ते शुभारंभ गार्डन सोसायटी जोडणारा रस्ता व स्ट्रीट लाईट या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.या सर्व कामांवर एकूण लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून नागरिकांसाठी ती सुविधा खुली करण्यात आली आहे. स्मशानभूमी निवारा शेड ८ लाख,गणेश घाट काँक्रीटीकरण व पायऱ्या ९ लाख,आगरी समाज हॉल ते पोर्णिमा सोसायटी रस्ता २.७० लाख,स्टुडिओ हाय फाय फेस टू ते शुभारंभ गार्डन सोसायटी रस्ता ३.६५ लाख,स्ट्रीट लाईट काम २.७० लाख करण्यात आले… या सोहळ्याला उपसरपंच गीता गणेश मोरे, ग्रामपंचायत सदस्या साक्षी सोमनाथ विरले, अस्मिता पपेश विरले, नूतन भरत पेरणे, रोशन संजय म्हसकर, सविता बळीराम कोळंबे यांसह कोल्हारे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्या जोशनाताई महेश विरले, शिवसेना शाखाप्रमुख जानु पेरणे, भाजप नेरळ मंडळ अध्यक्ष जयेश अशोक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.जे काम अनेक वर्षे अपूर्ण राहिले ते काम आज पूर्णत्वास नेले आहे. ग्रामस्थांच्या सेवेसाठीच आम्ही काम करत राहू,असे सरपंच महेश विरले यांनी यावेळी सांगितले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सरपंच व उपसरपंचांचे आभार मानले. खरोखरच कार्यसम्राट म्हणून महेश विरले ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.