पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
शेतकरी कामगार पक्षाच्या संघटनेत युवकांना संधी देण्याच्या परंपरेला पुढे नेत,युवा नेते बबन विश्वकर्मा यांची पनवेल महानगरपालिका जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे शेकापच्या स्थानिक संघटनेला नवे बळ मिळाले आहे.
निवडीनंतर पक्ष नेते व आमदार बाळाराम पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच इतर पक्ष नेते व कार्यकर्त्यांनीही विश्वकर्मा यांच्या निवडीचे स्वागत करत पक्ष संघटनेला नवा जोश मिळेल,असा विश्वास व्यक्त केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बबन विश्वकर्मा म्हणाले की,शेकापने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे,तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. पनवेल परिसरातील शेतकरी,कामगार,सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर राहीन.तसेच युवकांना संघटनेत सहभागी करून घेऊन त्यांना पुढाकार घेता येईल, यासाठी मी काम करणार आहे.
स्थानिक पातळीवर या निवडीमुळे शेकाप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून,आगामी काळात पनवेलमध्ये शेकापची संघटना अधिक प्रभावीपणे उभी राहील,असा विश्वास व्यक्त होत आहे.