माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
गणरायाला निरोप दिल्यानंतर आता कोकणवासी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर माणगाव बाजारपेठेतून मुंबईच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.गौरी-गणपतीचा उत्सव संपल्यानंतर आपल्या रोजगारासाठी, मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारपेठेत वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून, पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं दिसत आहे.गणेशोत्सवाचा आनंद मनामध्ये घेऊन भाविक आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. काहींच्या हातात अजूनही गणरायाच्या आठवणी, तर काहींच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची घाई स्पष्ट दिसते.