आमदाराचा पुतण्या प्रतिआमदार!महेंद्र थोरवेंच्या जागी प्रसाद थोरवे… निमंत्रण आमदाराला…कार्यक्रमात हजर मात्र पुतण्या…

0
4

कर्जत शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमात अनपेक्षित प्रसंग घडला. कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष हजेरी मात्र त्यांच्या पुतण्याने – प्रसाद थोरवे यांनी लावली. आणि हीच बाब सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.सरकारी कार्यक्रम असल्याने अधिकारी, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे यांची गैरहजेरी आणि त्याऐवजी प्रसाद थोरवे यांची ‘स्टाईलमधली’ एन्ट्री पाहून अनेकजण थक्क झाले. इतकेच नाही तर कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांना प्रसाद थोरवे यांनी थेट मार्गदर्शन केले. “जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकारी वर्गाला थेट सूचना दिल्या.या घटनेवर विरोधकांनी तुफान टीका सुरू केली आहे.आमदार निवडून आले आहेत महेंद्र थोरवे, पण सरकारी कार्यक्रमात कामकाज मार्गदर्शन करतोय त्यांचा पुतण्या हा कोणता लोकशाहीचा नमुना?असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.तसेच कुणीही येतो आणि आमदारांच्या खुर्चीत बसतो असे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधलाय… आमदार महेंद्र थोरवे यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पुतण्या प्रसाद थोरवे प्रतिआमदार झाल्याचे पाहायला मिळत आहे… कोणतंही पद नसताना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं अधिकार आमदार थोरवेंच्या पुतण्याला कोणी दिला…असा सवाल उपस्थित होत आहे…