हजारो कोटींचा निधी कुठे?मनसेची ‘भीक मागो’ शैलीतील लढाई… निकृष्ट रस्ते,भ्रष्टाचाराचा पसारा मनसेचे कर्जतमध्ये ‘भीक मागो’ आंदोलन…

0
2

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कर्जत तालुक्यातील निकृष्ट रस्ते कामे आणि निधीतील भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज भव्य ‘भीक मागो’ आंदोलन केले. हे आंदोलन नेरळ साई मंदिर चौकातून सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन कर्जत येथील लोकमान्य टिळक चौक–राष्ट्रवादी भवन–शिवसेना भवन दरम्यान संपन्न झाले.

मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांसाठी आलेल्या हजारो कोटींच्या निधीचा अपव्यय कुठे गेला, ठेकेदारांच्या फायद्यासाठी निकृष्ट कामे का झाली, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असे तीव्र प्रश्न उपस्थित केले. नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागून गोळा केलेली १२४० रुपये रक्कम मुख्यमंत्री निधीस जमा करून सरकारला इशारा देण्यात आला.लेखी आश्वासन देताच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईचे वचन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल शेळके, प्रविण राणे, नारायण भोईर, भूषण राणे, सागर भोईर, तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधुत अत्रे, कर्जत शहराध्यक्ष राजेश साळुंखे, नेरळ शहराध्यक्ष सुभाष नाईक, महिला शहराध्यक्षा तेजश्री भोईर, तसेच संदेश काळभोर, महेश लोवंशी, सतीश जाधव, प्रकाश सिगं आदींसह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.