गोगावलेंच्या पालकमंत्री पदाच्या स्वप्नावर दळवींची अडथळा?… तटकरेंचे गोडवे गाणारे दळवी आता गोगावलेंच्या आडवे?…

0
21

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे, यासाठी आमदार दळवी यांनीच मागणी करून गोगावले–तटकरे यांच्यात भांडण लावण्याचे काम केल्याची चर्चा रंगली आहे. विविध कार्यक्रमांतून गोगावलेच पालकमंत्री होणार अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे गोगावले वारंवार पालकमंत्री होण्याची घोषणा करू लागले.परंतु, त्यांच्या या स्वप्नांना दळवींनीच गोड बोलून फसवले, अशी चर्चा आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच आमदार दळवींनी सुनील तटकरे यांना गुरु मानून त्यांचे गोडवे गायले होते.आता मात्र दळवींचे समर्थकच एका कार्यक्रमात दळवींना मंत्रीपद द्यावे,अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी दळवीच अडथळा ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली असून, शिंदे गटातील दळवी हेच गोगावलेंसाठी घरभेदी ठरतील, असे बोलले जात आहे.