सीवूड्स माऊली सार्वजनिक नवरात्र मंडळाचा उत्सव दणक्यात साजरा… रास-गरबा,नृत्य आणि भव्य बक्षिसांची मेजवानी…सीवूड्स धारावे दणाणले…

0
20

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

सीवूड्स माऊली सार्वजनिक नवरात्र मंडळाने यंदाचा नवरात्रोत्सव उत्साह, आनंद आणि एकतेच्या वातावरणात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला.या सोहळ्याचे नेतृत्व मंडळाचे संस्थापक कुणाल नीरभवणे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी खास रचण्यात आला होता. कार्यक्रमात सर्वांचे मनोविनोद होईल यासाठी रास गरबा, नृत्य, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.रंगीबेरंगी वेशभूषेत तरुणांनी केलेल्या सहभागामुळे उत्सवाची शोभा अधिक खुलली.

या उत्सवाची खासियत म्हणजे ठेवण्यात आलेला भव्य लकी ड्रा, ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कुटी, टीव्ही,मोबाईल,सोन्याची नथ आणि महिलांसाठी पैठणी अनेक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. पहिलं पारितोषिक इलेक्ट्रिक स्कुटी विभागातील समाधान नावाच्या मुलाच्या नशिबी आले.त्याचे सर्वांनी उत्स्फूर्त अभिनंदन केले.

यावेळी बोलताना कुणाल दादा म्हणाले,या वर्षीच्या नवरात्र उत्सवात भव्य लकी ड्राचे आयोजन करण्यात आले होते आणि नागरिकांनी त्याचा आनंद लुटला.पुढील काळात विभागातील नागरिकांनी येणाऱ्या दिवाळीसाठी सज्ज व्हावे.या दिवाळीत आम्ही दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्याकाळ असे अनोखे कार्यक्रम घेऊन येणार आहोत..जसा जल्लोष मुंबईत होतो,तसाच जल्लोष सीवूड्स धारावे येथे करण्याचा आमचा प्रयत्न असेल.नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला.हा सोहळा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक नव्हता, तर समाजातील एकता आणि सण साजरा करण्याची खरी परंपरा अधोरेखित करणारा ठरला…