रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
श्री.सहाया विवांता सोसायटी येथे यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने श्रद्धापूर्वक,उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नवरात्राच्या नऊ दिवसांत सोसायटी परिसरात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी देवीची पूजा, आरती आणि महाप्रसादानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लहान मुलांसाठी आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. चिमुकल्यांनी साकारलेल्या विविध वेषभूषा व अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.
तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजक खेळ, महिलांसाठी स्पर्धा आणि तरुणांसाठी नृत्य-गीते अशा विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण सोसायटी परिसरात उत्साहाचे वातावरण होते.सर्व रहिवाशांनी एकत्रितपणे येऊन नवरात्रोत्सवाचा आनंद घेतला.सोसायटीच्या पदाधिकारी,महिला मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळत सर्वांना सहभागी करून घेतले. त्यामुळे हा उत्सव धार्मिकतेबरोबरच सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देणारा ठरला.