रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम पदाजी म्हात्रे साहेब यांच्या ७०व्या जयंतीनिमित्त प्रबोधन सभा व कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आला असून, ठिकाण आय.टी.आय. सभागृह, वसंतदादा पाटील नाट्यगृह, पनवेल असे आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. भुजंगराव सपकाळ साहेब (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महामंडळ कर्मचारी महासंघ) हे भूषवणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून मा. माधुदास साठे (अध्यक्ष, राज्य महामंडळ कर्मचारी संघ) व मा. कपिल पाटील (अध्यक्ष, राष्ट्रीय शेतकरी कामगार पक्ष) उपस्थित राहणार आहेत.विशेष प्रबोधनपर व्याख्यान “कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर” या विषयावर होणार असून, प्रा. डॉ. श्रीनिवास आळते आणि लोकगीतकार सोमाजी भगत यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक उत्साही होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शृती शाम म्हात्रे (कामगार नेत्री) यांनी केले आहे.