जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस,मक्का, सोयाबीन,ज्वारी,केळी या पिकांचे अतोनात असे नुकसान झालेले आहे या नुकसान भरपाईचे पंचनामे करतेवेळी कृषी आणि महसूल या विभागाच्या अधिकाऱ्यांवर वस्तुनिष्ठ पंचनामे करा म्हणजे काय तर आपल्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी साचलेले असेल अशाच शेतकऱ्यांचा आम्ही पंचनामे करू असा अर्थ संबंधित पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याने काढलेला दिसून येत आहे परंतु पाऊस जाऊन मोठा कालावधी लोटलेला आहे आणि सद्यस्थितीत कोणत्याही क्षेत्रामध्ये पाणी साचले दिसून येत नाही परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे बोंड सडून गेलेले आहेत जो थोडाफार माल झाडावरती शिल्लक होता तो गळून पडलेला आहे आणि झाड हे लाल झाले असून काही ठिकाणी कापूस हिरवागार दिसतो परंतु कापसाला लागलेला सर्व माल गळून पडलेला आहे त्यामुळे त्याची ग्रोथ होईल असे कोणतेही परिस्थिती नाही.कापूस जास्तीत जास्त वीस दिवसाचे पीक शिल्लक राहिलेला आहे ही परिस्थिती त्या झाडाची झालेली आहे तरीही सरसकट पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून आपण सरसकट पंचनामा करत नसाल तरी अडचण नाही परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात खरंच नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा झाला पाहिजे.हेक्टरी ५०हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे या मागणी करता महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात पारोळा तहसीलचे तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळी पारोळा तालुक्यातील शिवरे,आडगाव, तरवाडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून यावर शासन स्तरावरून योग्य ते प्रयत्न करण्यात यावे अशी चर्चा करण्यात आली असून तहसीलदारांनी नुकसान भरपाई व वन्य प्राण्यांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मकता दाखवत शासन स्तरावरून दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी निवेदनावर भुराजी कांडेकर,शिवाजी पाटील,नामदेव पाटील,महेंद्र पाटील, पिनू पाटील,भगवान पागरे,भगवान पाटील, नथू पाटील,संदेश पाटील,निंबा पाटील, विजय पाटील,महेंद्र पाटील,लखीचंद पाटील,दीपक पाटील, वसंत पाटील,सुभाष पाटील,दगा पाटील, कारभारी पाटील,योगेश पाटील,मच्छिंद्र पाटील, बन्सीलाल पाटील,संजू पाटील,राजेंद्र पाटील,श्याम पाटील,प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरी असून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
