कुणाल नीरभवणे यांचा महिलांसाठी अनोखा ‘मेहंदी उत्सव’… कुणाल नीरभवणे यांच्या पुढाकारातून महिलांना भाऊबीजची खास भेट…

0
8

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि आदर्शावर आधारित महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना राज्यभर राबविली जात आहे.त्याच धर्तीवर नेरुळ आणि स्वीवूड्समध्ये भावी नगरसेवक कुणाल नीरभवणे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली.

दिवाळीच्या उत्साहात महिलांना आनंद देण्याच्या हेतूने स्वीवूड्स परिसरात भाऊबीज मेहंदी उत्सव हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये महिलांना भाऊबीज भेट म्हणून हातावर मोफत मेहंदी काढून देण्यात आली. महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसत होती.

कुणाल नीरभवणे यांनी सांगितले की, “महिला या कायम घर, कुटुंब आणि कामात व्यस्त असतात. स्वतःसाठी वेळ काढणं त्यांना अवघड होतं.त्यामुळे अशा छोट्या उपक्रमांमुळे त्यांना थोडा आनंद आणि स्वतःसाठी वेळ मिळतो. त्यांच्या या विचारांना महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांनी उत्साहाने हजेरी लावली होती. पारंपरिक पोशाख, रंगीबेरंगी मेहंदी डिझाइन्स आणि दिवाळीचा सण यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

कुणाल नीरभवणे यांनी नेहमीच सामाजिक कामात सक्रिय भूमिका निभावली आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्यांची वृत्ती कायम राहिली आहे. महिलांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला आहे.

स्थानिक नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून कुणाल नीरभवणे यांच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा उपक्रमांमुळे केवळ सणाचा आनंदच नाही, तर समाजात एकमेकांबद्दलची आपुलकीही वाढते.” दिवाळीच्या या उत्सवात महिलांसाठी मिळालेली ही खास ‘भाऊबीज भेट’ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.