निलेश थोरे यांच्या कार्यशैलीचा प्रभाव – काकळ गौळवाडीचा भाजपात प्रवेश…

0
1

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाची संघटना वेगाने बळकट होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक २४ ऑक्टोबर रोजी साई पंचायत समिती गणातील काकळ गौळवाडी येथील ग्रामस्थांनी गाव कमिटीचे अध्यक्ष व साई विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते किसन महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप दक्षिण रायगड कार्यालय, अलिबाग येथे जाहीर पक्षप्रवेश केला.

विशेष म्हणजे, सर्व ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन संपूर्ण गावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड. महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माणगाव तालुकाध्यक्ष परेश सांगले, महिला तालुकाध्यक्षा सौ. रचना थोरे, तालुका उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर आणि संतोष कळंबे उपस्थित होते.

यावेळी किसन महाडिक यांच्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजानन रिकामे, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष नामदेव बाटे, गाव कमिटीचे सचिव सुनील महाडिक, खजिनदार दगडू महाडिक, मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश रिकामे, सचिव अशोक जळगावकर, उपसचिव विलास महाडिक, खजिनदार विनायक महाडिक, उपखजिनदार संदीप महाडिक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला.

याप्रसंगी ऍड. महेश मोहिते यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. किसन महाडिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “युवानेते निलेश थोरे हे रात्री-अपरात्री सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे, प्रशासनाची जाण असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी सौ. रचना थोरे यांना येत्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात येत असून त्यांच्या हातांना बळकटी देण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ आमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत.

युवानेते निलेश थोरे म्हणाले, “काकळ गौळवाडी हे केवळ भाजपात आलेले नाही, तर भाजप परिवाराचा एक भाग बनले आहे. येथील ग्रामस्थांच्या विकासकामांना गती मिळेलच, शिवाय ग्रामस्थांच्या अडचणी आणि संकटात भाजप पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील.या पक्षप्रवेशामुळे तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली असून या भागात भाजपाचे वारे अधिक जोमाने वाहू लागल्याचे स्पष्ट होत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत, अशोक वारगे, चेतन पाटील, तसेच महादेव कदम, नयन पोटले, साईनाथ पेणकर, अमोल पवार, सरचिटणीस बाबुराव चव्हाण, अनिल दांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.