अनिल मालुसरे,उतेकरांच्या प्रवेशाने तालुक्यात वादळ पिक्चर अभी बाकी है… सुनील तटकरेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का…

0
3

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

पोलादपूर तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथील कुणबी सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वादळ निर्माण केले आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, गोरक्षक दीपक उतेकर, तसेच तुर्भे खुर्दचे सरपंच गोविंद उतेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रवेशामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे.पोलादपूर तालुक्यातील विविध गटांतील नेत्यांच्या या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान आणखी बळकट झालं आहे.तटकरे यांनी या सोहळ्यात कार्यकर्त्यांना उद्देशून दिलेला “पिक्चर अभी बाकी है…हा संवाद आता राजकीय संदेश म्हणून पाहिला जातोय. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने तालुक्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत केली असून, महिला व युवक नेत्यांची नेमणूक करून स्थानिक नेतृत्व अधिक सक्षम बनवले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या नव्या घडामोडींमुळे विरोधी पक्षांच्या गटात खळबळ माजली आहे. सामाजिक गट, ग्रामस्थ आणि स्थानिक नेते यांच्या मतांचा परिणाम आता आगामी निवडणुकांवर थेट दिसेल. खा. सुनील तटकरे यांचा हा रणनीतिक निर्णय पोलादपूरच्या राजकारणात दीर्घकाळ टिकणारा ठसा उमटवेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा रंगली आहे.