मुरुडमध्ये अवैद्य दगडखान माफियांचा सुळसुळाट… उसडी गाव हादरलं…असलम कादरींचं २५ वर्षांचं अवैध उत्खनन उघड…

0
2

मुरुड शिवसत्ता टाइम्स (संतोष हिरवे):-  

मुरुड तालुक्यातील उसडी गावातील गुरुचरण जागेत असलम इस्माईल कादरी यांनी गेली २५ वर्षे अवैध दगडखान चालवून उत्खनन सुरू ठेवल्याचा गंभीर आरोप आहे.मौजे उसडी, गट नंबर १७० या मिळकतीच्या सुमारे ५० गुंठे जागेत हे बेकायदेशीर उत्खनन सुरू असून, या जागेचा सातबारा दाखवून मोठ्या प्रमाणात दगड काढला जात आहे.

या प्रकरणाकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे का, की काही समझोता झाला आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.मुरुड तहसीलदार कार्यालयाने श्री. असलम कादरी यांच्यावर ५८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, हा दंड प्रत्यक्षात वसूल होतो का नाही, याकडे मुरुड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “चिमूटभर रॉयल्टी आणि घबाडभर उत्खनन” अशा पद्धतीने दगडखान माफिया निसर्ग संपवण्याचा खेळ खेळत आहेत.

या खाणीमुळे दररोज रात्री गाव हादरते, तसेच जवळच असलेल्या चिंचघर येथील नैसर्गिक धरणाचा पाण्याचा स्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.म्हणूनच रायगड जिल्हाधिकारी यांनी उसडी येथील अवैध दगडखान त्वरित बंद करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.