मुंबई शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-
महाराष्ट्र राज्यतील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाला असून २ डिसेंबरला मतदान,३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या सर्व ठिकाणी २ डिसेंबर २०२५रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सचिव सुरेश काकाणे, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम:-
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात:
१९ नोव्हेंबर २०२५
•
अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२५
•
छाननी दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५
•
नामनिर्देशन माघारी (अपील नसलेल्यांसाठी) : २१ नोव्हेंबर २०२५
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २६ नोव्हेंबर २०२५* मतदान: २ डिसेंबर २०२५
मतमोजणी: ३ डिसेंबर २०२५
निकाल राजपत्रात प्रसिद्धी: १० डिसेंबर २०२५
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही प्रक्रिया सुरु केली आहे. या निवडणुकांमधून ८६८५९सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. २४६ नगर परिषदांपैकी १० नव्याने स्थापन झालेल्या आहेत,तर उर्वरित २३६ची मुदत संपलेली आहे. नगरपंचायतींच्या बाबतीत ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत असून, त्यापैकी १५ नवीन आणि २७जुन्या आहेत. उर्वरित १०५ नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही.
प्रभागनिहाय मतदान व्यवस्था नगर परिषदेत सदस्यसंख्या २० ते ७५ दरम्यान असून निवडणूक बहुसदस्य पद्धतीने घेतली जाईल.साधारण एका प्रभागात दोन जागा असतील; तर विषम संख्या असल्यास तीन जागा राहतील. मतदारांना सदस्य आणि अध्यक्ष या दोन्ही पदांसाठी मतदान करता येईल. नगर पंचायतीत मात्र एक सदस्य आणि एक अध्यक्ष अशी एकाच सदस्यावर आधारित रचना आहे.
ऑनलाइन प्रक्रिया आणि सुविधा
नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून दाखल करता येतील.
* एका प्रभागात उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची परवानगी.
* जात वैधता प्रमाणपत्र किंवा अर्जाची पावती सादर करणे बंधनकारक. निवडून आल्यास सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
* मतदार याद्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर होतील.मतदारांसाठी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून,त्यावरून मतदार केंद्र, उमेदवारांची माहिती आणि इतर तपशील शोधता येतील.अध्यक्षवर्ग पदासाठीमर्यादा सदस्यपदासाठी मर्यादा अ वर्ग नगर ₹ १५लाख परिषद ₹ ५लाख वर्ग नगरपरिषद क वर्ग ₹११.२५ लाख ₹३.५ लाख₹७.५ लाख ₹२.५ लाखपरिषदनगर पंचायत₹ ६ लाख₹२.२५ लाखया घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नवचैतन्य संचारले आहे.

