रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडातील 10 नगरपालिकांमधील 10 नगराध्यक्ष आणि 209 नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी रायगडात मतदान होत आहे.या मतदानासाठी अडीच लाख मतदार आपल्या नगरांचे नवे कारभारी निवडणार आहेत.यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाले आहे एक दिवसाचा मतदार राजा आपले बहुमोल मत कुणाच्या पारड्यात टाकतोय याबाबत कमालीची उत्सुकता ही लागली आहे जिल्ह्यातील 10 नगरपालिका हद्दीत 308 केंद्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे दोन लाख 37503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेण; मुरुड ; जंजिरा ; रोहा; श्रीवर्धन; महाड; उरण; खोपोली; कर्जत ; माथेरान नगरपालिकांसाठी हे मतदान होत आहे . नगराध्यक्ष पदासाठी 34 तर नगरसेवक पदासाठी 575 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 10 नगरपालिकांच्या एकूण 10 नगराध्यक्ष तर 107 प्रभागातून 217 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यापैकी सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

