उरण नगरपरिषदेच्या मतपेट्यांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा थेट ‘जागता पहारा’… उच्च न्यायालयामुळे मतमोजणी लांबताच, MVA उमेदवारांनी मतपेट्यांच्या सुरक्षेची घेतली थेट जबाबदारी…

0
1

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-

उरण नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता ती २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया लांबल्यामुळे, मतपेट्यांच्या सुरक्षिततेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

​लोकशाहीवर पूर्ण विश्वास असला तरी, निकालाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतपेट्यांची सुरक्षितता जपण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार स्वतः मैदानात उतरले आहेत. मतदान पेट्यांच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी उमेदवारांनी पोलीस प्रशासनासोबत स्वतःच ‘जागता पहारा’ सुरू केला आहे.
​मतदान: २ डिसेंबर
​मूळ मतमोजणीची तारीख: ३ डिसेंबरला होती… मात्र
​उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरची तारीख २१ डिसेंबर केली…
​निवडणुकीच्या निकालाची निष्पक्षता कोणत्याही परिस्थितीत जपली जावी, या उद्देशाने महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार सध्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी तळ ठोकून बसले आहेत.